
मुंबई : वेळेत कामे सुरू न करणे, जागेचा वाद तसेच कंत्राटदारांकडून असहकार्य यामुळे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लटकलेली जलसंधारणाची कामे रद्द करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २०० कोटींची ९०३ कामे रद्द करण्यात आली आहेत. पुढील टप्प्यात देखील मोठ्या प्रमाणात कामे रद्द होतील, असे विभागाकडून सांगण्यात येत आहे. ‘सकाळ’ने नऊ मे २०२५ रोजी यासंदर्भात बातमी दिली होती.