

नवी दिल्ली - नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक गुरूवारी सायंकाळी उशिरा नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीला महामंडळाचे सर्व 19 सदस्य उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.
बैठकीत साहित्य संमेलनाचे एकूण नियोजनाचा आढावा घेतला जाणार असला तरी त्यामध्ये या साहित्य संमेलनाच्या एकूण कामकाजात आणि प्रसिद्धीत सरकारने परस्पर केलेल्या हस्तक्षेपाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलन आणि एकूणच त्याचे नियोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद पुणे या संस्थेच्या मार्फत केले जात असताना या संमेलनाच्या एकूणच कार्यक्रमात, प्रसिद्धीत सरकारी यंत्रणा का राबत आहेत आणि राज्य सरकार यात खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप का करत आहे,यावर राज्यासह इतर राज्यातील महामंडळाच्या सदस्यांकडून विचारणा केली जाणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
नवी दिल्ली येथे होत असलेल्या संमेलनात सरकारी अधिकारी, मंत्री,माजी मंत्री यांचाच भरणा अधिक असल्याने यावर साहित्यिक वर्तुळातून प्रचंड टीका होते आहे.त्यात भर म्हणून सरकारकडून गेल्या दोन दिवसांपासून यासाठी शासनाच्या जनसंपर्क विभागाच्या मार्फत विविध माध्यमांवर सरकारी जाहिराती करण्यात येत आहेत.त्यातून हे संमेलन जणू सरकारच आयोजित करते आहे अशा प्रकारे त्या केल्या जात असल्याने व संमेलनाला या असे सरकारचे सांगत असल्याने या सरकारी हस्तक्षेपाबाबत साहित्यिक, मराठी भाषा प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दिल्लीत संमेलन होत असल्यामुळे केवळ काही पक्ष प्रमुख आणि इतरांना खुश करण्यासाठी सरकारचा, सरकारमधील काही मंत्र्यांचा हा खटाटोप आहे का? हे संमेलनाचे राजकीयीकरण का होते आहे असा सवाल उपस्थित केला जात असल्याने याविषयी महामंडळांने आपली भूमिका जाहीर करून सध्या होत असलेला सरकारी हस्तक्षेप थांबवावा, तसेच आजपर्यंत साहित्य संमेलनाच्या संदर्भात असलेला महामंडळाचे हे संमेलन असल्याचा ठसा जपावा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाची ही पूर्वसंध्येला होणारी आढावा बैठक आणि त्यामधील चर्चा महत्त्वाच्या ठरणार असल्याचे सांगण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.