Gold Theft
sakal
सोलापूर : जेऊर ते करजगी या रोडने जात असताना सराफाला वाटेत आडवून चौघांनी लुटल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास घडली. अभिनंदन पोतदार (वय ५७, रा. जेऊर, ता. अक्कलकोट) असे त्या सराफाचे नाव आहे.
सराफ अभिनंदन पोतदार हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे घरातून सोने-चांदीची बॅग घेऊन करजगी येथील दुकानाकडे जात होते. ते दररोज दुचाकीवरून करजगीला जात होते. शुक्रवारी जेऊरपासून काही अंतरावरील सोलर प्लॅन्टजवळील लकी ढाब्यापर्यंत ते गेले होते. त्यावेळी तेथे दबा धरून थांबलेल्या चारचाकीतील चौघांनी पोतदार यांची दुचाकी आडविली. त्यांनी गाडीतून उतरून थेट त्यांना मारहाण सुरु केली. त्यातील दोघांनी पोतदार यांच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावली. आरडाओरड करु लागल्यावर एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. पोतदार यांच्या अंगावरही खूप दागिने होते, त्यामुळे त्यांनी पोतदार यांना जबरदस्तीने चारचाकीत बसविले.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक विलास यामावर, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लवार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, उपनिरीक्षक सत्यपाल कांबळे आदी घटनास्थळी पोचले. त्या दरोडेखोरांच्या शोधासाठी अक्कलकोट दक्षिण पोलिसांची दोन तर शहर गुन्हे शाखेची तीन पथके रवाना झाली आहेत.
दरोडेखोर मराठीत बोलत होते
चारचाकीत चौघे होते, ते एकमेकांशी मराठीतून शुद्ध बोलत होते, असे सराफ पोतदार यांनी पोलिसांना सांगितले. चौघांनी पोतदार यांना चारचाकीत बसविले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील साडेतेरा तोळे दागिने काढून घेतले. त्यांना कणबस गावाजवळ सोडून चोरटे सोलापूरच्या दिशेने पसार झाले.
पाळत ठेवून साधला डाव
सराफ व्यापारी अभिनंदन पोतदार हे दररोज जेऊरवरून करजगी येथील दुकानाकडे दुचाकीवरुन जात असत. त्यांच्यावर अंगावर देखील मोठ्या प्रमाणावर दागिने असायचे. त्यांच्याकडे एक बॅग असायची. त्यांच्यावर दोन-तीन दिवसांपासून पाळत ठेवूनच दरोडेखोरांनी हा प्रकार केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, त्यांच्या बॅगेत एक किलो चांदीचे दागिने होते. पण, सोन्याचे दागिने नेमके किती होते हे त्यांना सांगता आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.