Pandharpur Viral Video: ‘रिल’मुळे दीड वर्षांनी सापडली माऊली! छायाचित्रकाराच्या व्हिडिओमुळे मायलेकाची भेट

Solapur Photographer Reel: सोलापूरच्या छायाचित्रकाराने पंढरपूरमध्ये चित्रित केलेल्या ‘रिल’मुळे मुंबईच्या तरुणाला माउली सापडली. शिवाजी धुते हे छायाचित्रकार सोलापूर ते पंढरपूर असा आषाढी वारीचा सोहळा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी जातात. यंदा ते पंढरपुरात असताना एका चिमुकल्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले.
Pandharpu Viral Video, Reel, Mother, Son, Insagram, Sakal
सोलापूरच्या छायाचित्रकाराने पंढरपूरमध्ये चित्रित केलेल्या ‘रिल’मुळे मुंबईच्या तरुणाला माउली सापडली.Sakal
Updated on

Pandharpur Viral Video Mother Son Reunites

पुणे : सोलापूरच्या छायाचित्रकाराने पंढरपूरमध्ये चित्रित केलेल्या ‘रिल’मुळे मुंबईच्या तरुणाला माउली सापडली. शिवाजी धुते हे छायाचित्रकार सोलापूर ते पंढरपूर असा आषाढी वारीचा सोहळा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी जातात.

नोकरीसोडून फोटोग्राफीचा छंद जोपासला

शिवाजी धुते हे पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करत होते. मात्र, कॉर्पोरेट कामांमध्ये त्यांचे मन रमले नाही. शेवटी नोकरीला रामराम करत त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला. गेल्या पाच वर्षांपासून ते वारी आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत.

१४ जुलैरोजी पंढरपुरात असताना एका चिमुकल्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तो चिमुकला पावसापासून संरक्षण करणारे मेणकापड विकत होता. त्याची धडपड धुते यांनी कॅमेऱ्यात टिपली. त्याचे रिल समाजमाध्यमांवर बरेच ‘व्हायरल’ झाले. marathiaaplakatta, businesssutra_digital या इन्स्टाग्राम पेजवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

रिल चिमुकल्याचा पण लेकाला त्याची माय दिसली

हे रिल मुंबईतील सूरज नावाच्या तरुणाने आपल्या मित्राच्या अकाउंटवर पाहिले. या व्हिडिओत हा मुलगा ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी एका महिलेकडे सुट्टे पैसे घ्यायला जाताना दिसतो. ती महिला म्हणजे हरवलेली आपली आई असल्याचे वैभवच्या लक्षात आले. दीड वर्षांपूर्वी सूरजची आई हरवली होती. मोबाईल, पर्स हे घरातच असल्याने सूरजचा आईशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्याने आईचा शोधही घेतला, पण पदरी निराशाच पडली. मात्र, अचानक एका व्हायरल व्हिडिओत आईचं दर्शन झालं आणि सूरजने थेट शिवाजी यांच्याशी संपर्क साधला.

धुते यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन सूरजने आईचा शोध घेतला. आपल्या एका रिलमुळे आई- मुलाची भेट झाल्याने शिवाजीने समाधान व्यक्त केले. 'दिवेघाटापासून मी वारी कॅमेऱ्यात टिपत होते. फोटो काढून झाले की रात्री मुक्कामाला परत सोलापूरला यायचो. आषाढी एकादशी पूर्वीचे आणि नंतरचे पंढरपूर कॅमेऱ्यात कैद करावं असा विचार आला आणि मी १४ जुलैला पंढरपूर गाठले', असे शिवाजी धुतेंनी सांगितल.

वारीमध्ये अचानक एका मुलाचा आवाज कानी पडावा, मी जवळपास अर्धातास थांबून त्याचं काम पाहावं. पैशासाठी त्या चिमुकल्याने एका माऊलीकडे जावं आणि त्या माऊलीच्या खऱ्या मुलाला माझ्या रील्समधून ही माऊली भेटावी, हा दैवी योगायोगच वाटतो मला. विठ्ठलाच्या कृपेनेच माझ्या हातून हे कार्य घडले.

शिवाजी धुते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com