

solapur crime
sakal
सोलापूर : करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे रविवारी (ता. १३) सात जणांनी बारामतीतील मेंढपाळांना बेदम मारहाण केली. यात मेंढपाळ महिलेच्या डाव्या डोळ्याजवळ जखम झाली आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांत पोक्सो, विनयभंगासह अन्य कलमांअंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले. राहुल हजारे (रा. वरकटणे, ता. करमाळा) व पिंटू बंजारा (मूळचा मध्यप्रदेश, सध्या रा. वरकटणे) अशी त्यांची नावे आहेत.
रविवारी (ता. १२) मेंढ्या रस्त्याने पुढे नेताना लगतच्या रिकाम्या शेतात गेल्याने सहा-सात जणांनी साडूची लहान मुलगी, मुलगा, साडू व मला मिळून मारहाण केली, अशी फिर्याद बारामती तालुक्यातील ३९ वर्षीय मेंढपाळ महिलेने करमाळा पोलिसांत दिली. शनिवारी (ता. ११) फिर्यादी महिला नातेवाइकांसह मेंढ्या घेऊन करमाळा तालुक्यातील सालसे येथे मुक्कामी होती. रविवारी (ता. १२) सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास फिर्यादी, त्यांची सासू, साडूची अल्पवयीन मुलगी व मुलगा, साडू, साडूचा चुलत भाऊ व अन्य नातेवाइक मेंढ्या चारत करमाळ्यातील सालसे गावातून पुढे जेऊरकडे जात होते. वरकटणेतून निंभोरे रस्त्याने जाताना एका मोकळ्या शेतात चार-पाच मेंढ्या गेल्या. त्यावेळी एकाने ‘तुमच्या मेंढ्या माझ्या रानात का येऊ दिल्या’ असे म्हणून साडूच्या मुलाला मारहाण केली. त्याला समजावून सांगितले तरी त्याने ‘तुम्ही इकडे कोणाला विचारून आला’ असे म्हणून गावातील काहींना फोन करून बोलावून घेतले. त्या सर्वांनी काठीने व दगडाने मारहाण केली.
यात फिर्यादीच्या सासूच्या उजव्या डोळ्यास दगड लागला. त्यांना काठीने डोक्यात मारले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपींनी साडूच्या मुलाच्या डोक्यात व हातावर काठीने मारले. तसेच अल्पवयीन मुलीचा हात ओढून काठीने मारून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सात जणांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
शेत रिकामे, कोणतेही पीक नाही, तरीही...
मेंढ्यांच्या कळपातील चार-पाच मेंढ्या रस्त्याने जाताना लगतच्या शेतात गेल्या. काही वेळातच मेंढपाळांनी त्या कळपात घेतल्या. तरीही ‘तुम्ही आमच्या शेतात मेंढ्या का येऊ दिल्या’ म्हणून संशयित आरोपींनी शिवीगाळ केली. ‘आमच्या मेंढ्या तुमच्या रानात आल्या असल्या, तरी तुमचे रान मोकळे आहे, मेंढ्यांनी काही खाल्ले नाही,’ असे मेंढपाळ संशयितांना समजावून सांगत होते. शेत रिकामे होते, शेतात पीक नव्हते, तरीदेखील संशयितांनी मेंढपाळ महिला व लहान मुला-मुलांनाही मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.