

Police officer taking bribe near police station
सोलापूर : बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका तरुण शेतकऱ्याची २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार लखन रामचंद्र ठोंबरे याला सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) अतुल सिद्रामप्पा न्यामणे (वय ५५, रा. उत्तर कसबा) याने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणुकीसाठी न्यामणे याने पोलिस ठाण्यातील शासकीय वाहनाचा वापर केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या न्यामणे याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांचे वाहन नेणारा चालकही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी पाच पोलिस चालकांची चौकशी केली.