50 कोटी देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्याची तयारी; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट: Aamravati mlc Electio Nana Patole 50 crores | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamravati mlc Electio Nana Patole 50 crores

Nana Patole: 50 कोटी देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्याची तयारी; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

अमरावती निवडणुकीत 50 कोटी रुपये देऊन निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी कमिशनरला इशारा दिला आणि ते टळलं असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Aamravati mlc Electio Nana Patole 50 crores Dhiraj Lingade Ranjit Patil maharashtra politics )

मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या परिषदेत नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी अमरावती निवडणुकीसंदर्भात मोठा खुलासा केला. नुकत्याच झालेल्या अमरावती विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी विजय प्राप्त केला आहे. पण इथे फिस्किंग झाल्याची माहिती समोर आली.

काय म्हणाले नाना पटोले?

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मतं घेतली. पण त्यांना विजयी घोषित करण्यात येत नव्हतं. त्याची मतमोजणी 30 तासांपर्यंत सुरू होती. त्यावेळी मला आयबीमधून एका मित्राचा फोन आला.

त्याने सांगितलं की अमरावतीचा निकाल बदलण्याची तयारी सुरू असून त्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम 100 कोटींपर्यंतही जाऊ शकते. हे ऐकल्यानंतर मी डिस्टर्ब झालो, मला रात्रभर झोप आली नाही.

आयबीमधून मित्राचा कॉल आल्यानंतर मी लागोलाग कमिशनरना कॉल केला आणि त्यांना असं काही केल्यास नोकरी घालवेन, तुझ्या खानदानापर्यंत जाईन असा इशारा दिला. मी धीरजला सांगिलं की प्रमाणपत्र घेऊन बाहेर पड.

अशी दादागिरी करावी लागते. ही निवडणूक जिव्हारी लागली म्हणून मी डिस्टर्ब झालो होतो. मी पूर्ण रात्र जागे होतो. सगळा राग होता तो निघाला. आज मात्र आनंद आहे.

मतमोजणी तब्बल 30 तास सुरु होती

काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले असून त्‍यांनी प्रतिस्‍पर्धी भाजपचे उमेदवार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा 3 हजार 368 मतांनी पराभव केला आहे. बाद फेरीच्‍या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्‍त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली.

विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा 47 हजार 101 इतका निश्चित करण्‍यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्‍त करून ते विजयी ठरले. ही मतमोजणी तब्बल 30 तास सुरु होती. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.