esakal | 'आप' लढवणार विधानसभा निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

'आप' लढवणार विधानसभा निवडणूक

आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रचार समितीची निवड करण्यात आली आहे. 

'आप' लढवणार विधानसभा निवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रचार समितीची निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, ढासळलेली कायदा व्यवस्था अशा अनेक प्रश्नांचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळेच सक्षम पर्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी निवडणुकीत उतरणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.

सध्या महाराष्ट्रासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या आप मॉडेलमध्ये आहेत, असा दावाही करण्यात आला आहे. यासाठी आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी महाराष्ट्राची निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. शेतकरी नेते रंगा राचुरे हे समितीचे अध्यक्ष, तर युनोमधील माजी अधिकारी किशोर मंद्यान हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. 

loading image
go to top