
छत्रपती संभाजीनगर : तुमचं सिल्लोडला येणं एवढं सोप्पं नाही, पण मी शहरात येणार, इथे बसून सर्वांची कामे करणार, असे म्हणत माजी पालकमंत्री यांनी भावी पालकमंत्री तथा आमदार संजय शिरसाट यांना थेट आव्हान दिले. इतकेच नव्हे, तर कुणाची गुंडगिरी किती आहे, ती कशी थांबवायची, याचाही निर्णय मीच घेणार, असे जाहीरपणे व्यक्त होत आमदार अब्दुल सत्तार यांनी दंड थोपटले.