Abdul Sattar: गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांनी केलं स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

Abdul Sattar: गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांनी केलं स्पष्ट

वाशिममधील गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात केली होती. दरम्यान, गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर आज हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Abdul Sattar statement on Gayran land scam allegations winter season )

नियमांनुसार जमीनीच वाटप केलं असल्याचे सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अपवादात्मक परिस्थीतीत जमीन देता येते. अशी माहितीही सत्तार यांनी यावेळी दिली.

काय म्हणाले सत्तार?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत गायरान जमीन घोटाळ्यासंदर्भात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर निवेदन सादर केलं. नियमांनुसारच जमिनींचं वाटप करण्यात आलं असून कोणताही घोटाळा झालेला नसल्याचा दावा आपल्या निवेदनात अब्दुल सत्तार यांनी केला. उच्च न्यायालय या प्रकरणी जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल. असही सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattar