बोरामणीतील दुर्घटना! शाळेचा निकाल वडिलांना दाखवायला आलेल्या एकुलत्या एक भीमरत्नचा विहिरीत बुडून मृत्यू; निकालासाठी मामाच्या गावाहून आलेल्या नैतिक माने याचाही मृत्यू

boramani accident
boramani accidentsakal
Updated on

सोलापूर : आईविना असलेला भीमरत्न ऊर्फ गौरव हरिशचंद्र राजगुरू (वय १४) हा आपल्याला मिळालेले गुण वडिलांना दाखविण्यासाठी बोरामणीत (ता. दक्षिण सोलापूर) आला होता. तर आठवीत शिकणारा नैतिक सोमनाथ माने (वय १६) हा शाळेचा निकाल असल्याने मामाच्या गावाहून गावी आला होता. ते दोघे येथील पोहून विश्रांतीसाठी दोघेही विहिरीच्या पायरीवर बसले होते. त्याचवेळी विहिरीचा अर्धा भाग कोसळला आणि त्यात दोघेही तळाशी गेले. त्या दोघांचाही मृत्यू झाला असून, शुक्रवारी (ता. २) त्यांचा अंत्यविधी पार पडला.

१ मे रोजी शाळांचा निकाल जाहीर झाला. निकाल घेऊन नैतिक माने हा घरी आला होता. तर आत्याकडे राहणारा भीमरत्नही गावी आला होता. याशिवाय इतर तिघेजण, असे पाचजण मिळून दत्ता शेळके यांच्या विहिरीवर पोहायला गेले होते. भीमरत्न व नैतिक दोघेही आई-वडिलांना एकुलते एक होते. पोहायला गेल्यावर काहीवेळ पोहून दोघेही विहिरीच्या पायरीवर थोडी विश्रांती घ्यायला बसले होते. इतर तिघेजण पाण्यात पोहत होते. अचानक विहिरीचा वरील भाग कोसळला आणि पायरीवर बसलेले भीमरत्न व नैतिक दोघेही विहिरीच्या तळाशी गेले. पाण्यातील तिघेजण मात्र या अपघातात बचावले. जवळील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या तिघांना बाहेर काढले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि आपत्ती व्यवस्थापन पथक, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दोन ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत विहिरीतील पाणी, गाळ काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर विहिरीच्या अगदी तळाशी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले. त्यांना पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला तर अख्खे गाव हळहळले.

गावात विवाह असल्याने टळला मोठा अनर्थ

बोरामणी येथील दत्ता शेळके यांच्या शेतातील विहीर ५० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्या ठिकाणी पोहायला येणाऱ्या मुलांची संख्या दररोज ३० ते ४० आहे. पण, गुरुवारी (ता. १) गावात विवाह असल्याने त्या विहिरीवर केवळ पाच मुले पोहायला आली होती. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर तिघांचा जीव वाचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com