चंद्रपूर : पत्नीचा खून केल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, आणि... | chandrapur crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
चंद्रपूर : पत्नीचा खून केल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, आणि...

चंद्रपूर : पत्नीचा खून केल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, आणि...

चंद्रपूर : एका व्यक्तीनं कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या (wife murder) केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी (Gondpipari) तहसील हद्दीतील भंगाराम तलोढी येथे घडली. राजू बावने आरोपीचं नाव असून त्याच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल (police complaint filed) करण्यात आला आहे. राजूने शनिवारी रात्री पत्नीची हत्या केल्यानंतर अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न (suicide attempt) केला. पत्नी योगिता (३५) आणि राजूमध्ये मोठी वादाची ठिणगी पडल्याने रागाच्या भरात राजूने पत्नीची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगिताचा जागीच म़त्यू झाला. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिला आहे. (Accused raju bawane arrested in wife murder crime in gondpipari)

हेही वाचा: जोखीम असल्याशिवाय कोरोना टेस्टची गरज नाही : केंद्र

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरोपी राजूने पत्नी योगिताची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्वत:ला विजेचा शॉक लावून मारण्याचा प्रयत्न राजुने केला मात्र त्यानंतरही त्याला मरण आले नाही. त्यानंतर त्याने विष प्राशन करुन पुन्हा एकदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला,परंतु तो प्रयत्नही असफल झाला.

राजूचा हा सर्व गोंधळ शेजाऱ्यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांना संपर्क केला त्यानंतर पोलिसांनी राजूला उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णलयात दाखल केलं. राजूची प्रकृती ठिक असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलीय.अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chandrapurcrime update
loading image
go to top