esakal | खासगी दवाखान्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई... कोण म्हणाले ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी दवाखान्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई... कोण म्हणाले ते वाचा 

राजकीय भाष्य करणे टाळले 
केंद्राकडून महाराष्ट्राला योग्य ती मदत केली आहे का? याबाबत विचारले असता श्री. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य करण्याचे टाळले. दोन्ही यंत्रणा आपापल्या परीने योग्य ती पावले उचलत असल्याचे सांगत त्यांनी या राजकीय विषयावर पडदा टाकला. 

खासगी दवाखान्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई... कोण म्हणाले ते वाचा 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण ठेवण्याबाबत काही अडचणी होत्या. त्यामध्ये आता बऱ्यापैकी स्पष्टता आली आहे. आपल्याला खासगी रुग्णालयासोबत काम करावे लागणार आहे. त्याठिकाणी काही प्रोटोकॉल असल्यामुळे अडचणी येतात. मात्र, त्यावर मार्ग काढत पुढे जाण्याची सरकारची भूमिका आहे. याउपरही खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांबाबत हलगर्जीपणा होत असेल तर त्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिला आहे. ते आज सोलापूर दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. 

श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सोलापूरात वाढणाऱ्या रुग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सोलापुरात कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी खास टीम पाठविण्याच्या सूचना मला काही जणांनी केल्या आहेत. त्यावर विचार करुन तशी टीम पाठविण्याचा प्रयत्न करु, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. सोलापुरात जर खाटांची कमतरता असेल तर ती वाढविण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य करण्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

सोलापूर शहरात विडी कामगार व झोपडपट्टी चा भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्याठिकाणी वेगळ्या तऱ्हेने काही उपाययोजना करता येतील काय? त्यानुषंगाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनीही हा विषय माझ्या कानावर घातल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. महात्मा फुले योजनेंतर्गत राज्यातील जनतेचा विमा उतरविला आहे. त्यामुळे त्याचाही फायदा होईल. 

खासगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाला दाखल केल्यास त्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्याची त्याठिकाणी गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर त्याला आर्थिक ताणही येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या रुग्णाला प्रशासनाने खासगी रुग्णालयात दाखल केले तर त्याचा खर्चही प्रशासनच करेल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते. 

100 व्या लॅबचे लोकार्पण पुढील आठवड्यात 
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मंत्रीमंडळातील सर्वच सहकारी चांगले काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाबत योग्य ते निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पुढील आठवड्यात 100 व्या लॅबचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 
 
प्लाझमा थेरपीची ट्रायल सुरु 
प्लाझमा थेरपीची ट्रायल करण्यास परवानगी दिली आहे. काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन राज्यातील 250 रुग्णावर त्याची ट्रायल घेतली जाणार आहे. त्यामुळे प्लाझमा तयार करण्यावरही सरकारचा भर असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

विद्यार्थी जिथे असेल तेथे परीक्षा 
कोरोनाचा संर्ग टाळण्यासाठी वैद्यकीय परीक्षा या विद्यार्थी ज्याठिकाणी आहे, त्याच ठिकाणी घेतल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांना थोडासा वेळ देण्याच्या सूचनाही विद्यापीठांना दिल्या असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.