राज्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या हजारच्या जवळ; पाहा कुठे किती रुग्ण

active corona cases in Maharashtra near 1000 mark check details
active corona cases in Maharashtra near 1000 mark check details esakal

राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीती दरम्यान शनिवारी, 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 155 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे सक्रिय रूग्णांची संख्या 998 वर पोहोचली. याशिवाय, दिवसभरात 1 कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, ज्यामुळे मृतांची संख्या 1,47,843 झाली. दिवसभरात 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या 77,28,891 झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 98.11% आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.87% आहे.

आजपर्यंत राज्यात करण्यात आलेल्या एकूण 8,01,88,145 चाचण्यांदरम्यान 78,77,732 कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह (09.82%) आढळल्या आहेत.

कुठे किती रूग्ण?

मुंबई सर्कल - ज्यामध्ये MCGM, ठाणे, TMC, नवी मुंबई, KDMC, उल्हासनगर MC, भिवंडी निजामपूर MC, मीरा भाईंदर MC, पालघर, वसई विरार MC, रायगड, पनवेल MC मध्ये एकून 115 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

नाशिक सर्कल - ज्यामध्ये नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगरमहापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार - 2 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

पुणे मंडळात - ज्यामध्ये पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा यांचा समावेश आहे या भागात 27 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कोल्हापूर सर्कल - ज्यामध्ये कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांचा समावेश आहे-- 1 नवीन प्रकरण नोंदवले गेले.

active corona cases in Maharashtra near 1000 mark check details
चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला ईडीचा दणका; जप्त केले 5,551 कोटी

औरंगाबाद सर्कल - ज्यामध्ये औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका -3 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

लातूर सर्कल - ज्यामध्ये लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका यांचा समावेश आहे - 2 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

अकोला सर्कल - ज्यामध्ये अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम यांचा समावेश आहे- 4 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

नागपूर सर्कल - ज्यामध्ये नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली यांचा समावेश आहे - 1 नवीन केस नोंदवली गेलीय.

active corona cases in Maharashtra near 1000 mark check details
'द्वेशाचं राजकारण' प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com