संजय दत्तच्या राजकीय प्रवेशाबाबत महादेव जानकर यांचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

अभिनेता संजय दत्तच्या राजकीय प्रवेशाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या राजकीय प्रवेशाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या 25 सप्टेंबरला संजय दत्त प्रवेश रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात जानकर बोलत होते. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात महादेव जानकर, पंकजा मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 

महादेव जानकर पुढे म्हणाले की, एनडीएसोबत आपलं भलं होणार आहे. कोणत्याही भाषण करून ब्रेकिंग देणाऱ्या सोबत आपण जायचं नाही. धनगर समाजाचे 60 टक्के काम झालं असून 40 टक्के बाकी असल्याचेही जानकर म्हणाले. यावेळी जानकर यांनी भावाच्या मदतीला बहीण आली असल्याने तिचेही आभार मानत असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sanjay Dutt Will Soon Enter In Rsp says mahadeo jankar