मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही खातेवाटपाचे घोंगडे भिजत पडले असताना शिवसेनेचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र पर्यावरण खात्याची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुकता दाखविली आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही खातेवाटपाचे घोंगडे भिजत पडले असताना शिवसेनेचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र पर्यावरण खात्याची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुकता दाखविली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आदित्य ठाकरे या मंत्रिमंडळात नेमकी कोणती जबाबदारी पार पाडणार, याविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता होती. पर्यावरण आणि क्रीडा या खात्यांबाबत आदित्य अधिक कल्पक काम करण्याची शक्यता असल्याने ही खाती त्यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आदित्य यांनीच पुढाकार घेतला होता. रामदास कदम पर्यावरणमंत्री असताना आदित्य यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
शिवसेनेत नाराजीचा स्फोट; हे माजी मंत्री पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नाहीत
मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेली वृक्षतोड रोखण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. पर्यावरण खात्याशी संबंधित विषयांमध्ये तरुणांना सोबत घेऊन अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असल्याने आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खाते मिळण्याची शक्यता आहे.