'Bulk Drug Park' प्रकल्प गेला असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना CM शिंदे म्हणाले...

'बल्क ड्रग पार्क' हा औषध निर्मितीचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Bulk Drug Park Also Gone From Maharashtra
Bulk Drug Park Also Gone From Maharashtraesakal
Updated on

'बल्क ड्रग पार्क' हा औषध निर्मितीचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याची माहिती आहे का? असा सवालच आदित्य ठाकरे यांनी विचारला. ठाकरेंच्या या उत्तराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. (Aditya Thackeray on CM Eknath Shinde Bulk Drug Park Also Gone From Maharashtra)

मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकराण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील. याला जबाबदार तेच आहेत. कारण गेल्या अडीच वर्षामध्ये काय परिस्थिती होती. कोणला कोण भेटत होत? काय करत होत ? कुठली इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी किती आणि कुठं बैठका घेतल्या? असे अनेक सवाल उपस्थित करत हल्ली कुठे कोणी दौरे करुन काय होत नाही. प्रत्यक्ष काम करावं लागतं. असा टोला एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंना लगावला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

'बल्क ड्रग पार्क'साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. हा प्रकल्प देखील आपण रायगड आणि इतर परिसरात आणणार होतो. यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा 'बल्क ड्रग पार्क' होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता.

या काळात सध्याचे मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटी देत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. पण या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल की, हा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रासाठी उपयोगी होता त्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता, तो महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. हे किती खरं आणि किती खोटं याचं उत्तर मला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षित असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com