Shivsena Ayodhya Posters
Shivsena Ayodhya PostersSakal

शिवसेना-मनसे वाद चिघळला; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेची पोस्टरबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्यांच्या या दौऱ्याआधीच पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दोघांच्याही दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मनसे- शिवसेनेतला वाद आता अयोध्येत पोहोचला आहे. शिवसेनेने तिथे पोस्टरबाजी करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

अयोध्येमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. असली आ रहा है, नकली से सावधान, असं लिहिलेले पोस्टर्स शिवसेनेकडून अयोध्येत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना या पोस्टर्समधून टोला लगावला आहे.

Shivsena Ayodhya Posters
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले..

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्याआधी अशा प्रकारच्या पोस्टरबाजीमधून शिवसेनेने राज यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेत्यांनीही राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com