Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी घेतला ‘हा’ निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी घेतला ‘हा’ निर्णय

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सिल्लोडमधील सभेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. त्यांच्या सभेस परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर त्यांच्या सिल्लोडच्या सभेला परवानगी मिळाली. पण ही सभा नियोजित ठिकाणी होणार नसून ठिकाणं बदलण्यात आलं. आदित्य ठाकरे यांची सभा 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडच्या आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत होणार होती पण आता ही सभा रद्द करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांनीच ही सभा रद्द केली असून सभेऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही मोठी चपराक बसणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या नव्या आक्रमक अंदाजावर खास गाणं लॉन्च

आदित्य ठाकरे यांची औरंगाबादच्या सिल्लोड येथे 7 नोव्हेंबर रोजी सभा होती. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच ही सभा होणार होती. अगदी त्याच दिवशी आणि त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मैदानातच शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा होणार होती. त्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांना सभेची परवानगी नाकारण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांची सभा आंबेडकर चौकात होणार होती. तर श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपीच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही मैदाने समोरासमोर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.

हेही वाचा: तुम्ही फक्त मंत्रीपदाचा 'फुलफॉर्म' सांगून दाखवा; आदित्य ठाकरेंचं राणेंना थेट आव्हान

आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या ठिकाणी सभा घेण्यास सांगण्यात आले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी इतर ठिकाणी सभा घेण्यास नकार देऊन सभा रद्द केली. आदित्य ठाकरे यांनी सभा न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. आदित्य ठाकरे सिल्लोडमधील ओल्या दुष्काळाची पाहणी करणार आहे.