आरटीईत सरकार नापास! ‘या’ जिल्ह्यांमध्ये प्रवेशाकडे पालकांची पाठ; नाशिक, नगरची आघाडी.

अशोक मुरुमकर
Wednesday, 22 July 2020

आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारने परवानगी दिली. 

सोलापूर : आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारने परवानगी दिली. मात्र, या प्रक्रियेकडे पालकांनी पाट केली केली असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, या दृष्टीने तात्पुर्त्या स्वरुपात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. 

वंचित व दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहु नयेत म्हणून सर्व माध्यमाच्या शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. २०२०- २१ या शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला लॉटरी काढण्यात आली होती. त्यात १००९२६ विद्यार्थ्यांची निवड घाली होती. तर ७५४६३ विद्यार्थ्यांर्थी प्रतिक्षा यादीत होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त ११५०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा कधी सुरु होणार हे अद्याप निश्‍चीत झालेले नाही. मात्र, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु झालेला आहे. त्यात आरटीईअंतर्गत देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या विनाआनुदानीत शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया पुर्णत: ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होते. कोरोनामुळे तात्पुरत्या स्वरुपानुसार सध्या प्रवेश दिले जात आहेत. यासाठी संबंधित पालकांना बोलवून प्रवेश दिले जात आहेत. गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. पालकांच्या हमीपत्रावर हे प्रवेश दिले जात आहेत.

दोन लाख ९१ हजार ३७० अर्ज

राज्यात ३६ जिल्ह्यांमधून आरटीईअंतगर्त आरटीईच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार प्रवेश घेण्यासाठी दोन लाख ९१ हजार ३७० अर्ज आले. यामध्ये मोबाईल ॲपचा वापर करुन पाच अर्ज आले आहेत. नेट कॅपी किंवा मदत केंद्रातून अर्ज केलेल्यांची संख्या दोन लाख ९१ हजार ३६५ आहे. यातील एक लाख ९२६ जणांचे सिलेक्शन झाले आहे. तर प्रवेश मात्र अद्याप एकाही विद्यार्थ्यांचा झालेला नाही. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार ३३१ शाळा आहेत. 

या जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश नाही
आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असली तरी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश झाला नाही. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवेश झाले असून १३७० विद्यार्थ्यांचे प्रवेश फायनल झाले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्याचा प्रवेशाबाबत दुसरा क्रमांक असून ११०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. बुधवारी (ता. २२) सहा वाजेपर्यंतची सकारच्या संकेतस्थळावरील ही आकडेवारी आहे. 

आकडेवारी
जिल्हे : ३६
आरटीई स्कूल : ९३३१
आरटीईच्या जागा : ११५४४६
ऑनलाइन अर्ज : २९१३६५
मोबाईल ॲपवरुन अर्ज : ०५
एकूण अर्ज : २९१३७०
सिलेक्शन : १००९२६
प्रवेश :११५०४


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission of 11504 RTE students in a month in Maharashtra