आरटीई प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. 29) प्रवेश घेता येणार आहे. 

प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत मार्चमध्ये काढण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ही प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतीक्षा यादीत 24 हजार 980 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील आठ हजार 480 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्‍चित झाले आहेत. तर आठ हजार 176 विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालकांसाठी सूचना :
- रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविली जाईल 
- पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून पाहावे 
- शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये 
- बालकांना शाळेत घेऊन जाऊ नये 
- आवश्‍यक मूळ कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन जावे 
- पोर्टलवरुन हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची सद्यःस्थिती : 
जिल्हा : निवड झालेले विद्यार्थी : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्‍चित प्रवेश 
पुणे : 4,765 : 1,885 : 1,624 
नगर : 803 : 335 : 368 
नाशिक : 1,360 : 480 : 432 
सोलापूर : 446 : 212 : 202 
ठाणे : 1,912 : 492 : 757 
औरंगाबाद : 1,539 : 292 : 395 
नागपूर : 1,780 : 756 : 431 
कोल्हापूर : 270 : 89 : 128 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission of eight thousand 480 students from the waiting list in the state has been confirmed