मावा बनवायला निघालेली ६५ लाखांची सुपारी जप्त? कर्नाटकातून नागपूरला जाणारा ट्रक सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पकडला, वाचा...

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तुळजापूर नाक्याजवळ ट्रक पकडला. ट्रकमधून ३५० पोती (२४,४९८ किलो) सुपारीची वाहतूक केली जात होती. सुपारीची एकूण किंमत ६४ लाख ९१ हजार ९७० रुपये इतकी आहे. सुपारीत भेसळीचा संशय असून मावा बनविण्यासाठी सुपारीचा वापर केला जाणार होता का, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.
solapur crime

solapur crime

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : कर्नाटकातून ट्रक भरून सुपारी घेऊन जाणारा ट्रक सोलापूर-तुळजापूरमार्गे नागपूरला निघाला होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तुळजापूर नाक्याजवळ ट्रक पकडला. ट्रकमधून ३५० पोती (२४,४९८ किलो) सुपारीची वाहतूक केली जात होती. सुपारीची एकूण किंमत ६४ लाख ९१ हजार ९७० रुपये इतकी आहे. सुपारीत भेसळीचा संशय असून मावा बनविण्यासाठी सुपारीचा वापर केला जाणार होता का, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे. तरीपण, राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शहर-ग्रामीण हद्दीत ओला- सुका मावा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला सर्रासपणे विकला जातो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून छापेमारी, धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सोमवारी (ता. १३) कर्नाटक राज्यातून सोलापूरमार्गे नागपूरला सुपारी घेऊन एक ट्रक निघाला होता. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख, नंदिनी हिरेमठ, चन्नवीर स्वामी व प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी उत्कर्षा एखंडे यांचे पथक सोलापूर-तुळजापूर रोडवर पोचले.

तुळजापूर नाक्याजवळ ट्रक आडवून चालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली. ट्रकमधील पोत्यातील सुपारी तुटलेली आणि खराब झालेली दिसून आली. प्रथमदर्शनी निकृष्ट दर्जाची सुपारी नेमकी अवैध कामासाठी नेली जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार सुपारी जप्त केली आहे.

वरिष्ठ अधिकारी म्हणाले...

जप्त केलेल्या सुपारीचे नमुने मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com