शाईफेक लोकशाही विरोधीच, तरी आरोपींची केस मोफत लढवणार, कारण…; असीम सरोदेंनी मांडली भूमिका | Asim Sarode on Chandrakant Patil Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adv Asim Sarode ink on Chandrakant Patil case say will fight case for free on behalf of ink throwers

शाईफेक लोकशाही विरोधीच, तरी आरोपींची केस मोफत लढवणार, कारण…; असीम सरोदेंनी मांडली भूमिका

महाराष्ट्रातील महापुरूषांबाबत वादग्रस्त विधानावरून भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून आता राजकारण पेटताना दिसत आहे.

दरम्यान या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी हे यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापर करण्याचे हे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

"शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल.परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध" असे असीम सरोदे म्हणाले आहेत.

त्यांनी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये "शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे, यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध, असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.

इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत...

"कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा, इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही. चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे, ते गौरवर्तन आहे." असं मत असीम सरोदे यांनी ट्विट करत मांडलं आहे.

हेही वाचा: FIFA WC 2022 : मोरोक्कोच्या खेळाडूनं आईसोबत साजरा केला विजयाचा आनंद; Viral Video ने जिंकली मनं

हे कलम का लावायला सांगण्यात आले?

"मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? इतकाच प्रश्न आहे." असेही सरोदे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Chandrakant Patil : शाईफेकीच्या घटनेवरून थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

"शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे पण म्हणून सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान आहे." असंही सरोदे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Chandrakant Patil : 'भीक' शब्दाने भाजपमध्येच मतभेद! केंद्रीय मंत्र्याने चंद्रकांत पाटलांना सुनावलं

शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल झाल्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्र्यांचा कायदा हा आता नियमांप्रमाणे चालत नाही, त्यांच्या मर्जीपर्यंत चालतो. जो यांच्या विरोधात काही बोलतो त्याच्या मागे हे एजन्सी लावतात. ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच आहेत. त्यांच्यातला एखादा यांच्या पक्षात गेला तर त्याला वॉशिंगमशीन मध्ये साफ झाल्याप्रमाणे क्लीन चीट दिली जाते. हे देशाने पाहिलं आहे. मी कुठला आरोप करत नाही, हा डेटा सांगतो असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Chandrakant PatilBjp