उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 28 July 2020

उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ ॲप्लिकेशनचे सोमवारी (ता.२७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंबई - उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ ॲप्लिकेशनचे सोमवारी (ता.२७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योग, कामगार, तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी ६ जुलै रोजी महाजॉब्स वेबपोर्टलेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्स हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘महाजॉब्स ॲप''चे अनावरण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. ॲप वापरण्यासाठी नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा, पॅन क्रमांक अधिवास प्रमाणपत्र आवश्‍यक असणार आहे.

पर्यटनाला तीन हजार कोटींचा फटका; लॉकडाउनचा परिणाम

ॲपची वैशिष्ट्ये
१. सुलभ नोंदणी प्रक्रिया
२. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रोफाइल संपूर्ण माहितीसह उद्योजकांना दिसतील.
३. पसंतीनुसार नोकरी शोधण्याचा पर्याय.
४. नोकरी शोधणारे अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात.
५. अर्ज केल्यानंतर नोकरीची स्थिती सहजपणे पाहण्याची सोय.
६. नवे तसेच अनुभवी यासाठी नोंदणी करू शकतात.
७. नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advantage of the jobs available in the industrial sector uddhav thackeray