Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात काय फायदे, काय तोटे?

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatrasakal

भारत जोडो यात्रा. काँग्रेस खासदार राहुल गांधींनी कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात केलीय. ही यात्रा 7 नोव्हेंबरला तेलंगणाहुन महाराष्ट्रात दाखल झाली. देशभरातील विविध राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळाला. अशात ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर अगदी शेवटच्या टप्यात असतांनाच राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आणि भारत जोडो यात्रा जोरदार चर्चेत आली. पण खरचं महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला नक्की फायदे आणि तोटे झाले.

भारत जोडो यात्रेला विविध राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ही यात्रा भारत जोडण्यासाठी निघाली असल्याचे राहुल गांधी वारंवार आपल्या सभांमधून सांगत होते. तर दुसरीकडे या यात्रेत अनेक सामान्य नागरिक सहभागी होत असल्याचे दिसून आले. परंतु महाराष्ट्रात ही यात्रा दाखल होताच चित्र पटलायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या एका वक्तव्यामुळे काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात या यात्रेमुळे काँग्रेसला कोणते फायदे आणि तोटे झाले?

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

फायदे -

१. गाव पातळीवरील काँग्रेसपर्यंत थेट पोहचण्यास मदत आणि आगामी निवडणुका

भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमधून सुरु झाली. नांदेडमधील अधिकाअधिक भाग हा काँग्रेस प्रणित आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसला गळती सुरु झाल्याची किंबहुना स्थिती योग्य नसल्याची निवडणूक आकड्यांवरुन दिसून आले आहे. अशात गावपातळीवर असलेले कार्यकर्तेही मूळ काँग्रेसपासून दूरावत असल्याचे दिसून आले. मात्र याच भारत जोडो यात्रेमुळे त्याच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचं दिसून आले. त्यामुळे काँग्रेसला या यात्रेतून थेट ग्रामीण भागात पोहचता आले. तर ही यात्रा सुरु असतानाच नुकत्याचं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे या यात्रेचा थेट फायदा निवडणुकीत होवू शकतो.

२. महाराष्ट्रात काँग्रेसची बाजू मजबूत करण्यास मदत मिळाली

भाजपा सत्तेत आल्यापासून काँग्रेसची बाजू कमकुवत झाल्याचं दिसून आले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या काँग्रेसची महाराष्ट्रातील आमदारांची आकडेवारी पाहता राजकीय स्थिती चांगली नसल्याचं दिसून येते. अशावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला बळ देण्यासाठी भारत जोडो यात्रे आवश्यक होतीच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या यात्रेचा थेट परिणाम काँग्रेसला मजबूत करण्यात होणार असल्याचेही बोलले जात आहे.

३. राहुल गांधींची प्रतिमा अधिक उजळण्यासाठी मदत

खासदार राहुल गांधी नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे राजकारणात चर्चेत असतात किंबहुना त्यांच्या विधानावरुन सोशल मीडियासह राजकारणात राहुल गांधींवर टीका, मस्करी होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. इतकचं नव्हे तर राहुल गांधींवर घराणेशाहीचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे यात्रेतून ते थेट सामान्याप्रमाणे जनतेत मिसळल्याने अधिक प्रमाणात त्यांची प्रतिमा उजळण्यासाठी मदत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तोटे -

१. सावरकरांवरील वक्तव्यांमुळे पुन्हा महाराष्ट्रात काँग्रेसला फटका बसणार?

नांदेडपासून महाराष्ट्रात यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत होता. याच यात्रेत महाविकास आघाडीचे अनेक नेते देखील सहभागी झाले होते. चांद्यापासून ते बांध्यापर्यंत महाराष्ट्रात यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हिंगोलीत झालेल्या एका सभेत राहुल गांधींनी सावरकरांवर थेट टीका केली. यामुळेच नव्या वादाला तोंड फुटले. यावरुन राज्यात चांगलाच राजकीय रणकंदन माजला. राहुल गांधींची शेगाव येथिल सभा उधळण्याचा प्रयत्न देखील विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींच्या एका वक्तव्याचा थेट फटका महाराष्ट्रात काँग्रेसला बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांकडे झालेलं दुर्लक्ष

भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. तेव्हा निवडणुकीत वातावरण फारस दिसून आलं नाही. परंतु ही यात्रा तेलंगणामध्ये दाखल होताच गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे आधीच काँग्रेसकडे प्रचाराकरीता दिग्गज असा चेहरा दिसून येत नाही. तेव्हाच राहुल गांधी भारत जोडो यात्रेत असल्याने ते थेट या दोन्ही राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात दिसून आले नाही आहे. गुजरातमध्ये सध्या भाजपाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. परंतु राहुल गांधी महाराष्ट्र असल्याने या राज्याच्या प्रचारासाठी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा थेट फटका गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूकीत काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. असे असले तरी राजकारणात अंतिम निकालावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com