Uddhav Thackrey : दादा भूसेंना धक्का देत ठाकरेंनी खेळली नवी खेळी; भाजपचा उमेदवार गळाला advay hire joining shivsena Thackrey group soon big blow to dada bhuse and bjp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackrey

Uddhav Thackrey : दादा भूसेंना धक्का देत ठाकरेंनी खेळली नवी खेळी; भाजपचा उमेदवार गळाला

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठं खिंडार पडल्याचं दिसून आलं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला पुन्हा भरारी देण्यासाठी संजय राऊत यांनी दोन वेळा दौरा केला. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सेनेला भरारी देण्यासाठी त्यांनी महत्वाचे प्रयत्न केले. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपच्या नेत्याला आपल्या गटाकडे वळवण्यात यश मिळवले आहे.

नाशिकमधील माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ.अद्वय हिरे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला धक्के बसल्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपला मालेगाव मध्ये मोठा धक्का दिला आहे. याचबरोबर हिरे यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या समोर देखील आव्हान निर्माण होणार आहे.

हेही वाचा: Ahmednagar Murder Mystry: आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह ७ जणांच्या मृत्यूमागे करणी ?

भाजप नेते डॉ.अद्वय हिरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. डॉ.अद्वय हिरे यांनी रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: LIVE Update : कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या

हीरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला उभारी मिळणार आहे. ते तिथे पक्ष बांधणीसाठी मदत होईल. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती असल्याचे देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना दिसुन येत आहे.