Kishori Pednekar: चार सदनिकांवरुन किशोरी पेडणेकरांना एसआरएचा दणका, सोमय्यांच्या तक्रारीची दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar

Kishori Pednekar: चार सदनिकांवरुन किशोरी पेडणेकरांना एसआरएचा दणका, सोमय्यांच्या तक्रारीची दखल

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. पेडणेकर यांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा पहिला मोठा झटका आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएने हे आदेश दिलेत.

हे ही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील 4 सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याचे आदेश दिले आहेत. पुढील 4 दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Shivsena: सावरकरांबाबत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार...'; ठाकरे गटाने पुन्हा सुनावले खडेबोल

सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत.एसआरए अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत.