Dhananjay Munde: भुजबळांनंतर अजितदादा गटातील धनजंय मुडेंना धमकीचा फोन; मागितली 50 लाखांची खडणी

यापूर्वी भुजबळांना धमकी आली होती, धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Mundeesakal

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादांच्या गटासोबत गेलेल्या छगन भुजबळांनंतर आता धनंजय मुंडे यांना पण धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या परळ येथील निवासस्थानी हा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्याकडं ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. (After Chhagan Bhujbal threatening call to Dhananjay Munde of NCP Ajit Pawar group)

Dhananjay Munde
Abrogation of Article 370: कलम ३७० रद्द होणार की कायम राहणार? सुप्रीम कोर्टात होणार दररोज सुनावणी

यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती. पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

Dhananjay Munde
Lokmanya Tilak Award: "PM मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवणार"; संजय राऊतांची टीका

भुजबळांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी रायगडमधील महाड इथून अटक केली आहे. धमकी देणाऱ्याचं नाव प्रशांत पाटील असून तो कोल्हापूरच्या चंदगड येथील आहे. या तरुणानं मद्यधुंद अवस्थेत ही धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com