‘या’ कार्डमुळे शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख कर्ज; कसे मिळणार कार्ड वाचा

After getting Kisan Credit Card farmers will get a loan of Rs 3 lakh
After getting Kisan Credit Card farmers will get a loan of Rs 3 lakh

सोलापूर : शेतकऱ्यांना सावकराच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांसाठी ‘किसान क्रेडीट कार्ड’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र बँका हे कार्ड देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना हे कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सुविधांपासून शेतकरी वंचीत राहत आहेत. हे कार्ड मिळावे म्हणून काही शेतकरी बँकांकडे हेलपाटे मारत आहेत. कृषी मंत्री दादा भुसे यांनीही हे कार्ड वितरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची योजना जाहीर केली होती. यामध्ये तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाणार आहे.  मात्र, अनेक बँका हे कार्ड देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी किसान क्रेडीट कार्ड मिळावे यासाठी बँकाकडे हेलपाटे मारत आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक कामावर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम बँकेच्या कामकाजावरही झाला आह, काही बँका कोरोनामुळे कार्ड देण्यासाठी अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत.

शेतकरी भुषण अभिमन्यू म्हणाले, किसान क्रेडीट कार्ड मिळावे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकाकडे अर्ज केला होता. मात्र, अद्याप कार्ड आले नाही. कार्डसाठी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे. कार्ड असल्यानंतर पैसे मिळणार आहेत. एवढेच फक्त माहीत आहे. मात्र, अर्ज केल्यानंतर त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. मात्र, माझं कार्ड अद्याप मिळालेले नाही. 
प्रगतशील शेतकरी अभिजीत वाघमोडे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करणार आहे. मात्र, मशागतीसाठी व बी- बीयाणासाठी पैसे लागणार आहेत. अशा परस्थितीत. त्याला पैसे मिळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सध्या बँकांकडून पीक कर्जही मिळत नाही. किसान क्रेडीट कार्ड मिळावे म्हणून दोन बँकाकडे अर्ज केला आहे. मात्र अद्याप एकही कार्ड मिळाले नाही. एका बँकेनी मला सांगितले याबाबत आम्हाला आदेश आलेला नाही. दुसऱ्या बँकेने अर्जही घेतलला नाही. गावासाठी जी बँक आहे. तिथेही हेलपाटे मारले आहेत. माझ्यासह अनेक शेतकरी कार्ड मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. 

किसान क्रेडीट कार्ड योजनेचा उद्देश
- पिकाची लागवड करणे
- कापणीनंतरचे खर्च करणे
- शेतकऱ्यांच्या दैनंदिन घरगुती गरजा भागवणे
- शेतीच्या आवजाराची देखभाल करणे
- शेतीविषयक कामांसाठी खेळते भांडवल देणे

किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी पात्रता
- सर्व शेतकरी या किसान क्रेडीट कार्डसाठी पात्र असणार आहेत. यामध्ये सयुक्तीक आणि वैयक्तिक शेतकरी लाभ घेऊ शकतात.
- भाडेकरु शेतकरी, हिस्सेदार पिकधारक ओरर लीसेस

किसान क्रेडिट कार्डसाठी किती कर्ज मिळणार त्याचा व्याजदर
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. त्याला सरकारी आर्थिक अनुदान योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत व्याज दर प्रतिवर्ष ७ टक्के व्याज
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तीन लाखापेक्षा जास्त कर्जावर शेतीविषयक कामासाठी दिलेल्या आगाऊ रकमांवर लागू केल्याप्रमाणे

कर्ज वाटपासाठी सोपी पद्धत
1 प्रत्‍येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज नाही
२ शेतकऱ्यासाठी व्‍याजाचा भार कमी करणे व या योजनेमुळे खात्रीलायकपणे कर्ज मिळण्‍याची हमी
३ शेतकऱ्यांच्‍या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्‍यास मदत
४ जास्‍तीत जास्‍त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्‍या उत्‍पन्नावर आधारित
५ कर्जाची परतफेड फक्‍त हंगामा नंतर
६ जामीन, मार्जिन व दस्‍तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर लागू असल्‍याप्रमाणे

कसे असेल शेतकर्यांचे किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्डबरोबर शेतकऱ्यांना एक पासबुक मिळेल. त्‍यामध्‍ये नाव, पत्ता, जमिनीच्‍या मालकीचे (स्‍वामित्‍वाचे) विवरण, कर्ज घेण्‍याची सीमा, कायदेशीर मान्‍यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्‍याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्‍या व्‍यवहाराची नोंद करण्‍याची सोय असे दोन्‍ही हेतू साध्‍य करण्‍यासाठी करण्‍यात येईल.
अशी असेल कर्जाची परतफेड
- खरीप पीकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील मार्चपर्यंत
- रब्बी पिकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील जूनपर्यंत
- बागायती पिकासाठी कर्ज घेतले असेल तर पुढील सप्टेंबरपर्यंत

किसान क्रेडिट कार्ड लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचा ७/१२, ८अ, ६ड, उतारे चतु सिमा
- इतर कोणत्याही बँकेचे थकित नसल्याचे प्रमाणपत्र
- १ लाखापेक्षा जास्त कर्जासाठी जिथे जमीन गहाण ठेवली जाते अजा कर्जांसाठी बँकेच्या पॅनेलवर असलेल्या वकीला कायदेशीर सल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com