Baba Siddiqui Resign: 'मला खूप काही बोलायचं आहे पण...',बाबा सिद्दीकी यांचा ४८ वर्षांनी अखेर काँग्रेसला जय महाराष्ट्र! कोणत्या पक्षात जाणार?

Baba Siddiqui Resign: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
Baba Siddiqui Resign
Baba Siddiqui ResignEsakal

Baba Siddiqui Resign: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत याबाबातची माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी येत्या १० तारखेला अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत ४८ वर्षांचा पक्षासोबतचा प्रवास थांबवला आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Baba Siddiqui Resign
Baba Siddique : सलमान शाहरुखची भांडणे सोडवणारा नेता का आहे काँग्रेसवर नाराज? स्वतःच दिलं स्पष्टीकरण

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील मोठे आणि महत्त्वाचे नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून सिद्दीकी पिता पुत्र अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Baba Siddiqui Resign
Devendra Fadnavis : भाजपने राज्यसभेसाठी ९ जणांची यादी पाठवली; पंकजा मुंडेंच्या भेटीवर फडणवीस म्हणाले...

आपल्या पोस्टमध्ये काय म्हणालेत बाबा सिद्दीकी?

"मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा माझा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला खूप काही बोलायचे आहे. पण, ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या...या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाकडून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा ते आमदार होते. याशिवाय त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. 2000 ते 2004 दरम्यान ते मुंबई म्हाडा बोर्डाचे अध्यक्ष देखील होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com