
Namdev Shashtri: भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत ते गुन्हेगार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय, सामाजिक सलोखा बिघडवला जातोय, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं शास्त्री म्हणाले. नामदेव शास्त्रींनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्रींचे आभार मानले आहेत.