

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या रायगड दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी लावलेल्या हजेरीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजaशहा यांची ‘सह्याद्री’ या शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला उपस्थित नव्हते.