Bacchu Kadu: तर मी अडीच वर्षानंतर मंत्री होईन; नाराजीच्या सुरात बच्चू कडूंनी दिले उत्तर

Bacchu Kadu
Bacchu Kaduesakal
Updated on

आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन. असे उत्तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी नाराजीच्या सुरात दिले. त्याचा हा नाराजी सुर पाहता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.(After two and a half years as a minister Bacchu Kadu displeasure once again )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या पक्षातील, मित्रपक्षातील आणि काही अपक्ष आमदारांच्या साथीने भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण अपक्ष कार्यकर्त्यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान दिले नाही. याबाबत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदेंनी दुसऱ्या विस्तारात आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिला असल्याचे अनेकदा त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आता पुन्हा एकदा मंत्रीपदाच्या प्रश्नावरुन बच्चू कडूंची नाराजी दिसून आली आहे. दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिवाळीचा मुहूर्त असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी बच्चू कडूंना आशा आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात दुसरे नाव चर्चेत आहे ते संजय शिरसाट यांचे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी, मी काय प्रमुख आहे का? असा प्रतिप्रश्नच आमदार कडू यांनी पत्रकारांना केला. आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन, असं नाराजीच्या सुरातलं उत्तर बच्चू कडू यांनी दिलं.

मंत्री पदावरुन शिंदे गटातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात काहींना जुनीच खाती देण्यात आली आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना या मंत्र्यांकडे जी खाती होती तीच त्यांना देण्यात आली. तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com