महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प 'गुजरात'ला; PM मोदी करणार प्रकल्पाचं उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प 'गुजरात'ला; PM मोदी करणार प्रकल्पाचं उद्घाटन

महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प 'गुजरात'ला; PM मोदी करणार प्रकल्पाचं उद्घाटन

मुंबई : सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून आधीच गुजरातमध्ये गेला आहे. त्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. मात्र भाजपने यासाठी महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. (After Vedanta Foxcon Bulk Drugs Park now another project towards Gujarat)

एअर बस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकल्पासाठी फॉलोअप घेणारं एक तरी पत्र कधी लिहिलं का? सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकार आणि एअरबस यांच्यात एक करार झाला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र तत्कालीन मविआ सरकारने एकही पत्र लिहिलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला गेला होता. तेव्हा मविआने प्रयत्न का केला नाही. हा प्रकल्प गुजरातला जाण्यात मविआचं अपयश असल्याचंही उपाध्ये यांनी म्हटलं.

मोठे प्रकल्प राज्यात आणणे मुख्यमंत्र्यांचं काम असतं. मात्र आमचे मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडतच नव्हते, असंही उपाध्ये यांनी म्हटलं.

वास्तविक पाहता, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वीच म्हटलं होतं की, एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. टाटाच्या कोलॅब्रेशनसोबत हा प्रकल्प येणार आहे. मात्र तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.