वेदांतानंतर 'PhonePe'ची बारी, गब्बर होतायेत शेजारी; रोहित पवारांच्या ट्विटनं खळबळ

महाराष्ट्रातून आता आणखी एका कंपनीनं आपलं मुख्यालय शेजारील राज्यात हलवलं आहे.
phonepe Ipo
phonepe Ipo Sakal

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आता 'फोन पे' हा युपीआय कंपनीनं देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेत कर्नाटकात बस्तान बांधलं आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. (after Vedanta now PhonePe turn Neighboring states got investment says Rohit Pawar)

वेदांतानंतर PhonePeची बारी... गब्बर होतायेत शेजारी...महाराष्ट्र पडतोय आजारी...व्वा रे सत्ताधारी!!! टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक PAY पण महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा WAY! अशा नेमक्या शब्दांत रोहित पवार यांनी ट्विट करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

मोदी-शहांच्या इशाऱ्यावर चालण्यात शिंदे-फडणवीस सरकार मग्न

तर दुसरीकडं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे 'वेदांता-फॉक्सकॉन' आणि 'बल्क ड्रग पार्क' सारखे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराज्यांत गेल्यानंतर आता 'फोन पे' ने सुद्धा आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे, याला सर्वस्वी शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे. राज्यासाठी विधायक व जनतेच्या हिताची कामे करण्याऐवजी उत्सव साजरे करणे, बंडखोर आमदारांच्या विभागात सभा व बैठका घेणे, इतर पक्षातील लोक शिंदे गटात सामील करणे, दिल्लीवाऱ्या करणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनसुद्धा दर आठवड्याला दिल्लीवारी करून मोदी-शहांच्या इशाऱ्यावर सरकार चालवणे यामध्येच हे शिंदे-फडणवीस सरकार मग्न आहे, असा आरोपही भाई जगताप यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे नगरविकास खाते घेऊन काय करताहेत?

जी गोष्ट या प्रकल्पांबाबत तीच वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील ७ वर्षांपासून नगरविकास खाते आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी विविधपदांच्या भरतीच्या मुलाखतीचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. प्रकल्प महाराष्ट्राचा आणि मुलाखती चेन्नईमध्ये! हा काय प्रकार आहे? महाराष्ट्रातील मुलांनी मुलाखत द्यायला चेन्नई मध्ये जायचे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खाते घेऊन काय करत आहेत, असा सवाल देखील भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com