esakal | आघाडीच्या रणनीतीचे सर्वाधिकार पवारांकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia-and-Sharad

राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्‍वास दाखविला असून, जनतेचा हाच विश्‍वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. जनतेच्या प्रश्‍नांसाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करू.
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

आघाडीच्या रणनीतीचे सर्वाधिकार पवारांकडे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भाजप-शिवसेना युतीला राज्यात सत्ता स्थापन करण्यास अद्याप मुहूर्त मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत राजकीय रणनीती ठरविण्याचे सर्वाधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले नाही, तर आघाडीने शिवसेनेच्या पुढाकाराने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्यात का, याबाबत सोनिया गांधी यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. यावर मतप्रदर्शन करताना सोनिया यांनी राज्यात असा कोणताही राजकीय निर्णय घ्यायचा झाल्यास याबाबत शरद पवार यांचे मत जाणून घ्या. तसेच, त्यांच्या सल्ल्यानेच पुढे जा, असे सांगितले असल्याचे 
समजते. यामुळे आघाडीची सगळी सूत्रे पवारांकडे आली अाहेत.