चिनी कंपन्यांबरोबरील करार ‘जैसे थे’  - सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 June 2020

हेंगली, ग्रेट वॉल मोटर्स या चीनमधील कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने १५ जून २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई - हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स-फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीनमधील कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने १५ जून २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज स्पष्ट केले. 

राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-२’च्या माध्यमातून सरकारने गुंतवणूकदारांबरोबर करार केले. याअंतर्गत १२ करार करण्यात आले. त्यामध्ये सिंगापूर, दक्षिण कोरिया, अमेरिकन कंपन्यांबरोबरच भारतीय कंपन्यांबरोबरही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘‘हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स-फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, एक हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव ‘टप्पा-२’ येथे करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र सरकार स्पष्ट धोरण जाहीर करण्याची वाट पाहण्यात येईल,’’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जानेवारी महिन्यामध्येच चीनच्या जीडब्ल्यूएमने तळेगाव येथील अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचा कारखाना विकत घेण्यासंदर्भात करार केला. जीडब्ल्यूएम या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. येथे वाहननिर्मितीसाठी रोबोटिक्समधील आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पारकेर शी यांनी म्हटले आहे. आम्ही भारतामध्ये टप्प्याटप्प्यात एक अब्ज अमेरिकी डॉलरची (७६०० कोटी) गुंतवणूक करणार आहोत. जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करण्यासाठी आम्ही ही गुंतणूक करणार आहोत. यामध्ये संशोधन आणि निर्मिती केंद्र, पुरवठा साखळी या माध्यमातून तीन हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, असेही शी यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agreements with Chinese companies have been kept 'as is' says Subhash Desai