

Maharashtra Agriculture Day 2026
esakal
भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि या देशाच्या नकाशावर महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रातील महत्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी १ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात 'कृषी दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या शेतीला आधुनिकतेची दिशा देणारे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मृती जपण्याचा आणि मातीशी इमान राखणाऱ्या बळीराजाचा सन्मान करण्याचा सोहळा आहे.
एकीकडे आज संपूर्ण राज्यात 'महाराष्ट्र कृषी दिन' मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे मात्र राज्यातील बळीराजा अस्मानी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील अनेक भागांत पेरण्या थांबल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे.