
पाली : सुधागड तालुक्यातील रजिप नेणवली शाळेत मंगळवारी (ता. 1) कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व वृक्ष वाढदिवसाचा एक अनोखा व विधायक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व जपण्यासाठी आणि वृक्षांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या विशेष दिनी, शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.