कृषी मंत्रालयातून अधिकाऱ्यांना 15 कोटी वसुलीचे टार्गेट? धमकीचे Call Viral

Abdul Sattar
Abdul SattarSakal

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रूपये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तर ही वसुली करण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. तर प्रत्येक अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी याद्या पाठवण्यात आल्या असल्याचं वृत्त सकाळ अॅग्रोवनने दिलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कृषीमंत्र्यांच्या कार्यालयातील गृह खाते आणि महसूल खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना महोत्सवासाठी पैसे गोळा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे अधिकारी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना दमदाटी आणि धमक्या देत निलंबन करण्याचा धाक दाखवत आहेत. तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांना केलेल्या फोनचे ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सिल्लोड महोत्सवाचे पास
सिल्लोड महोत्सवाचे पासSakal

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघात १ ते १० जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन असल्याचं भासवून पैसे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणे विक्रेते, खते, किटकनाशके, कृषी उद्योग कंपन्या, संघटना, यंत्रे पुरवठादार यांच्याकडून हे पैसे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे.

"कृषी आयुक्तांनी आम्हाला एका बैठकीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला सिल्लोड महोत्सवासाठी पैसे गोळा करावे लागतील असं सांगितलं. यावेळी कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, संचालक उपस्थित होते." अशी माहिती एका संचालकाने दिली आहे.

Abdul Sattar
Ravish Kumar : रविश कुमारांचे मराठी कनेक्शन; दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मराठीतील Video Viral

या दबावामुळे अनेक कृषी खात्यातील अधिकारी तणावाखाली आले असून आपल्याला दिलेले टार्गेट एका महिन्याचा पगार आणि त्यात काही रक्कम टाकून पूर्ण करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या फोन कॉलचे डिटेल्स तपासले तर कोट्यावधींचा घोटाळा बाहेर येऊ शकतो असं मंत्रालयातील सुत्रांनी सांगितलं आहे.

काय आहे टार्गेट

आपापल्या विभागातून या महोत्सवात स्टॉल लावणारे वेगवेगळ्या रक्कमेच्या प्रवेशिका आणण्याचे टार्गेट या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० अशा प्रवेशिकांचा सामावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com