राज्यात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

विदर्भासह राज्यात ढगाळ वातावरण होत असून, गुरुवारी दुपारनंतर उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथेही ढग गोळा झाले होते. विदर्भाच्या विविध भागांत उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे : विदर्भातील वनी (जि. यवतमाळ) परिसरात गुरुवारी (ता. ५) पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भासह राज्यात ढगाळ वातावरण होत असून, गुरुवारी दुपारनंतर उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथेही ढग गोळा झाले होते. विदर्भाच्या विविध भागांत उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पंजाबपासून राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत  हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटकपासून दक्षिण श्रीलंकेपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत (ता. ९) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४१.६, नाशिक ४०.१, सांगली ३८.४, सातारा ३८.५, सोलापूर ४०.७, मुंबई ३२.०, अलिबाग ३१.५, रत्नागिरी ३२.४, डहाणू ३३.३, उस्मानाबाद ४०.३, आैरंगाबाद ३९.२, परभणी ४१.६, नांदेड ४१.५, अकोला ४२.६, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ३९.६, नागपूर ४०.९, वर्धा ४१.५, यवतमाळ ४१.५.

Web Title: agriculture news marathi rain possibilities state maharashtra