शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी, पीक रचनेत बदल घडवून आणणे, दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली रोपे मिळावीत, या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना आणली आहे.
Ahilyadevi Holkar Scheme : शेतकऱ्यांना (Farmers) पूरक व्यवसाय म्हणून केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध योजना सुरू केल्या जातात. दुग्धव्यवसायासारख्या व्यवसायांसाठी अनुदान दिले जाते. अशाच योजनांचा भाग म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना (Ahilyadevi Holkar Scheme) होय. ही नव्याने सुरू करण्यात आली आहे.