

Balasaheb Thorat and Sujay Vikhe Share the Same Platform
esakal
Ahmednagar District Bank Election: All-Party Leaders Meet : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेतील गेस्ट हाऊसमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान या बैठकीदरम्यान सुजय विखे यांनी थोरात यांना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.