पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्... ओवैसींचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्'... ओवैसींचा संताप
'पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्'... ओवैसींचा संताप

'पवार आणि फडणवीसांचं लग्न झालं अन्'... ओवैसींचा संताप

sakal_logo
By
टीम इ सकाळ

सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या कारभारावर ओवैसी यांनी संताप केला आहे. शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे. याशिवाय जेव्हा एखादा आमचा एखादा माणूस बीजेपीमध्ये जातो तेव्हा त्याच्यावर टीका केली जाते. मात्र तुमच्या घरातील व्यक्ती बीजेपीमध्ये जाते शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहते तेव्हा त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. प्रत्येकवेळी नावं ठेवली जातात. आम्ही सगळं विसरायचं आणि तुम्ही कसेही वागायचे हा कुठला न्याय, तीन जणांचे सरकार आणि म्हणतात सेक्युरिझम वाचवायचा आहे, आता आपण यावर काय बोलायचे, गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये झालेल्या एका सभेमध्ये एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी परखड शब्दांत टीका केली आहे.

आता या सरकारवर विश्वास काही ठेवू नका. त्याचा काही उपयोग नाही. आता आपल्याला बदलावे लागणार आहे. या सत्ताधाऱ्यांना ओळखावे लागणार आहे. आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सेक्युलरिझमचे हत्यार काढण्यात आले. मुस्लिमांना आमिष दाखवण्यात येते. आमच्या भावनांचा आदर ठेवला जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे सुरु आहे. याचे वाईट वाटते. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकला होता. त्यांचे हे लग्न झाले आणि लगेच तुटलेही अशी टिप्पणी ओवैसी यांनी यावेळी केली.

आता सगळेजण आम्हाला विसरत आहेत. मुस्लिमांच्या आरक्षणाचा विसर पडला. आता गोष्ट वानखेडेंची सुरु आहे. त्याला काय अर्थ आहे का...असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला आहे. मुस्लिम बांधवांनो खिशात पेन ठेवायला शिका...म्हणजे आपल्या अवती भोवती जे काही चालले आहे ते आपल्याला टिपून ठेवता येईल. दुसरं म्हणजे तलवार नव्हे तर कलमच आपल्याला जिवंत ठेवेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top