
लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबई शहरातील वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईने मंगळवारी पाच वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा अनुभवल्याचा दावा ‘सफर’ने केला आहे. हवेच्या गुणवत्तेत मुंबईने लंडन, सिंगापूर, टोकियो, सिडनी या शहरांनाही मागे टाकल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील या शहराची लंडन, टोकियोपेक्षा हवा आहे शुद्ध
मुंबई - लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबई शहरातील वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईने मंगळवारी पाच वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा अनुभवल्याचा दावा ‘सफर’ने केला आहे. हवेच्या गुणवत्तेत मुंबईने लंडन, सिंगापूर, टोकियो, सिडनी या शहरांनाही मागे टाकल्याचे सांगण्यात आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रात्रभर पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. त्यातच मंगळवारी मुंबईत प्रदूषणाची सर्वांत कमी पातळी नोंदवण्यात आली. वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) २०१५ नंतर सर्वाधिक शुद्ध हवेत मुंबईकरांनी श्वास घेतला.
मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार
कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने सध्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नाही. मुंबईत सोमवार रात्र ते मंगळवारी पहाटेदरम्यान मुसळधार पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले होते. ताशी ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी प्रदूषके वाहून नेली, असे ‘सफर’चे (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च) संचालक गुफरान बेग यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ‘एक्यूआय’ आणि हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
- गुफरान बेग, संचालक, सफर