आगाऊ आरक्षणात घट नाही

आगाऊ आरक्षणात घट नाही

मुंबई - ‘एअर इंडिया’वर प्रवाशांचा अजूनही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नसल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाकडून देण्यात आली. कंपनीच्या विक्रीची चर्चा असली तरी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत असून मुंबई ते लंडन जाण्यासाठी दुसरी सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

सध्या मुंबई ते लंडनदरम्यान एअर इंडियाची थेट विमान सेवा उपलब्ध आहे. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या मार्गावर दुसरी दैनंदिन सेवा चालवण्याचा कंपनीचा विचार आहे. मात्र हिथ्रो विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने मुंबई ते स्टॅंडस्टेड (लंडन) मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळेल, यासह इतर बाबींचा अभ्यास सुरू असून त्याचा अहवाला प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. एप्रिल २०२० पर्यंत या मार्गावर ‘एअर इंडिया’ची विमानसेवा सुरू होण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त  केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com