IGI Airport: मुंबई-दिल्ली विमानात किळसवाणा प्रकार! प्रवाशाने सीटच्या बाजूलाच केली शौच, लघवी अन्...

मुंबई-दिल्ली विमान प्रवासात प्रवाशाने चालू विमानात केली लघूशंका
IGI Airport
IGI AirportEsakal

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांची अनेक किळसवाणी कृत्य समोर येतात, ही कृत्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. असेच एक ताजे प्रकरण आहे ते एअर इंडियाच्या मुंबई-दिल्ली विमान प्रवासातील, या विमान प्रवासामध्ये एका तरुणाने विमानातील सीटजवळ शौच करून लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला विमानात शौचास आणि लघवी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. फ्लाइट कॅप्टनच्या वतीने IGI विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरनुसार, २४ जून रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक एआयसी ८६६ वरून एक प्रवासी मुंबईहून दिल्लीला जात होता. तो सीट क्रमांक 17F वर बसला होता. त्याने विमानाच्या 9व्या रांगेत शौचास आणि लघवी करून त्याठिकाणी थुंकला आहे.(Latest Marathi News)

या प्रवाशाने विमानात शौच आणि लघवी केल्याचा आरोप आहे. 24 जून 2023 रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआयसी 866 फ्लाइटमध्ये प्रवासी राम सिंह सीट क्रमांक 17F वर बसला होता. त्याने विमानात शौच, लघवी केली आणि थुंकला.

फ्लाइटच्या केबिन क्रूने या घटनेवर आक्षेप घेतल्यानंतर केबिन क्रू अमन वत्सने पायलट-इन-कमांड कॅप्टन वरुण संसारे यांना घटनेची माहिती दिली आहे. याची माहिती तातडीने एअर इंडियाला पाठवण्यात आली. विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. विमानातील इतर प्रवाशांनी या घटनेबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला. कॅप्टन वरुण संसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 294/510 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

IGI Airport
Raju Shetti बाबत कोर्टानं घेतला मोठा निर्णय; 'या' प्रकरणातून शेट्टींसह 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

तक्रारीनुसार, फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवासी तरुणाच्या या कृत्याने चांगलेच संतापले होते. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच एअर इंडियाच्या सुरक्षा प्रमुखांनी त्याला पकडले आणि आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात नेले. आरोपी प्रवासी आफ्रिकेत कुक म्हणून काम करतो. विमानात लघुशंका करणाऱ्या प्रवाशाला क्रु ने थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर क्रु वर प्रवाशी थुंकल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

IGI Airport
मोठी बातमी! कर्मचारी मारहाण प्रकरण भोवलं; आमदार परबांसह 25 जणांविरुध्द गुन्हा, चार जण अटकेत

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लाइट कॅप्टनच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयजीआय पोलिस स्टेशनमध्ये कलम 294/510 अंतर्गत गुन्हा नोंदवला आणि आरोपी प्रवाशाला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला जामीन मिळाला. आता पुढील तपास सुरू आहे.(Latest Marathi News)

IGI Airport
Mamata Banerjee : काँग्रेस-माकपची भाजपला साथ असल्याची टीका; ममतांचा नाराजीचा सूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com