अजित पवारांसोबत फक्त सुनिल तटकरे; शिष्टाईचे जोरदार प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

सुनिल तटकरे व शरद पवार यांच्यात सतत संभाषण होत असून अजित पवार यांचे मन वळवण्याबाबत दोघांमधे संवाद सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

मुंबई : अजित पवार यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांच्या सोबत फक्त सुनिल तटकरे असून शिष्टाईचे ते जोरदार प्रयत्न करत असल्याची माहीती आहे. 

सुनिल तटकरे व शरद पवार यांच्यात सतत संभाषण होत असून अजित पवार यांचे मन वळवण्याबाबत दोघांमधे संवाद सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

काल रात्री सहा वाजल्यापासूनच अजित पवार व सुनिल तटकरे कर्जतच्या परिसरात होते. 
सुनिल तटकरे कोणाचाही फोन घेत नसून फक्त शरद पवार यांच्याशीच त्यांचा संपर्क सुरू आहे. लवकरच अजित पवार व शरद पवार यांच्यात भेट व्हावी यासाठी तटकरे मध्यस्थी करत असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar and Sunil Tatkare together in Mumbai