Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

Ajit Pawar Mumbai NCP
Ajit Pawar Mumbai NCP
Updated on

Ajit Pawar Mumbai NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार गट सक्रिय झाला आहे. अजित पवार यांनी काल मुंबईत बंडानंतर पहिली बैठक घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला आहे.

अजित पवार राज्यात नवीन नेमणुका देखील करत आहेत. अजित पवार यांनी नरेंद्र राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र राणे यांचे नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताब्यात घेण्याची लढाई तीव्र झाली आहे. दोन्ही गटांमध्ये ताकदीची कसोटी लागली आहे. बंडखोरीनंतर दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांसमोर अडचणी वाढल्या आहेत. पक्ष, चिन्ह आणि आमदारकी सांभाळण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

Ajit Pawar Mumbai NCP
Chandrayan 3 Date: तारीख ठरली! 'या' दिवशी अवकाशात झेपावणार चांद्रयान, ISRO सज्ज

अजित पवार गट सातत्याने पक्ष, आमदार आणि चिन्हावर दावा मजबूत करताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीची पटकथा फार पूर्वीच लिहिली गेल्याची चर्चा आहे. हायकमांडलाही त्याबाबत सुगावा लागू दिला जात नव्हता. ३० जून रोजी झालेल्या बैठकीतही अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Ajit Pawar Mumbai NCP
Lalu Prasad Yadav on PM : बिना बायकोचे पंतप्रधान आवासात राहणे चुकीचे, लालू यादवांचे संदर्भासहित स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com