Ajit Pawar : थोडं थांबा, सुरू झालंय; शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजितदादाचं सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar, Devendra Fadnavis and Eknath Shinde

Ajit Pawar : थोडं थांबा, सुरू झालंय; शिंदे सरकारमधील अस्वस्थतेवर अजितदादाचं सूचक विधान

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत दावे करण्यात येत आहेत. (AJit Pawar news in Marathi)

हेही वाचा: Accident Video: 'आज चारो मरेंगे' म्हणत बीएमडब्ल्यू पळवली २३०च्या वेगाने; पुढे जावून...

अजित पवार म्हणाले की, जोपर्यंत आमदारांचं संख्याबळ १४५ आहे, तोपर्यंत सरकार चालणारच. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे कळेल. ज्या आमदारांना सोबत घेतलं, त्यांना दिलेल्या आश्वासनबाबत आता अस्वस्थता सुरू झाली आहे. त्यामुळे थोडं थांबायला हवं. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रात जे सुरू आहे ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं तर स्थिरता राहणार नाही. अशा प्रकारचे पायंडे महाराष्ट्राला आणि देशालाही परवडणार नाही. हे सर्व शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. शिवाय शिवसैनिकांनाही हे आवडलेलं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा: MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार स्वत: अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते असं बोलत आहेत. महाराष्ट्रात अतिशय स्थिर आणि गतीशील सरकार आलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा निवडून येऊ, असंही फडणवीसांनी म्हटलं.